दि लॉस्ट चाईल्डहूड – माझं मत

भाग्यश्री बीडकर यांनी लिहिलेली शॉर्टफिल्म बघितली. मर्मभेदक अशी पटकथा लिहिली आहेस. याशिवाय त्याचं दिग्दर्शनही उत्तम जमलंय. पटकथेचे ताळतंत्र कुठेच सुटल्याचे जाणवलं नाही.

बालकामगार कायदा होऊन कितीतरी वर्षे झाली आहेत. जेव्हा जेव्हा प्रवासाला जावं तेव्हा मात्र हायवेवर असणारे ढाबे अन तिथं काम करणारे बाल-कामगार आपल्या दृष्टीस पडतातच. होय. ढाबा हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. अनेक असे उद्योग, दुकान, संस्था आहेत ज्या अजूनही बालकामगारांना राबवून घेत असतात. ‘दि लॉस्ट चाईल्डहूड’ ही शॉर्टफिल्मसुद्धा हेच कटूसत्य आपल्या समोर आणते.

हे सत्य समोर आणताना अनपेक्षित असणारा शेवट पाहायला मिळतो. मानवी मेंदूचे आणि शॉर्टफिल्मची अशी सायकॉलॉजीकल बोलणी झालेली आहे की मला शेवट काहीतरी अप्रतिम, अनपेक्षित वगैरे हवा तरच ती फिल्म बघितल्याचे मला समाधान मिळेल. तर या तोंडी कराराचे पालन ही शॉर्टफिल्म शेवटपर्यंत करते. दिग्दर्शक आणि पटकथेत तितकं वजन आहे.

यात कॅमेरा वापरतानाही कौशल्य दाखवलं गेलं आहे. ते म्हणजे नीट व्हाइट बॅलन्स ठेवणं, अँगल वैशिष्ट्यपूर्ण असणं अन शेवटचा एक सुंदर झूमिंग. काही कथाच अशा असतात ज्यांना फार पॅन, टीलट, करण्याची गरजच असते असे नाही. शॉट्स नीट लावून फ्रेम्स आकर्षक करणे ही पुन्हा एकदा मेंदूची बेसिक गरजच. मेंदूत स्वतःत उमटवत जाणाऱ्या चित्रांत खूप चांगलं काय हे आपणच सूचना देऊन सांगितलं असते. यामुळे तसे चित्र उमटल्याशिवाय त्याला समाधान मिळतच नाही. तेवढी काळजी डिओपीने घेतली आहे.

या फिल्मची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे चपखल संवाद. बघा ना लोकांना जिथे नको तिथे बोलायला खूप आवडतं. तिथं जाऊन घसाफाडून बोलतील. लेखिकेने मात्र समाजाचे चित्रण अचूक टिपत एकही शब्द संवादाचा न लिहिता सामाजिक भान ताळ्यावर आणलं आहे. संवाद नसणं हीच या शॉर्टफिल्मची मोठी गोष्ट आहे. तसेही बालकामगार बघून आपण तरी कितीवेळा समोरच्या मालकाला त्याच्या याबद्दल विचारतो ? पुढच्यावेळी मात्र, नक्कीच याबद्दल विचारा.

या फिल्मची अजून एक गंमत आहे. त्यासाठी सगळ्या टीमचे कौतुक करायला हवे. ती गंमत आहे पार्श्वसंगीताची. एक जुनं सुमधुर गीताचा यासाठी वापर केला आहे. इतरवेळी नॅचरल एमबियांस तसाच ठेवला आहे.

शॉर्टफिल्म या आकृतिबंधला साजेसा असा सात मिनिटांचा वेळ, पहिल्याच शॉटपासून विषयावर लख्ख प्रकाश पाडण्याचा प्रयत्न, अवाजवी भारीपणा कुठेच न वाटता केवळ आशय सरळसोट पोहोचवण्यात ही या फिल्मची स्टारमार्क वैशिष्ट्य म्हणता येईल. अभिनंदन marya films. अजून अनेक विषय बहारदार पद्धतेने खुलवून पडद्यावर नक्कीच आणाल ही अपेक्षा व्यक्त करतो.

© विशाल लोणारी 2018

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

search previous next tag category expand menu location phone mail time cart zoom edit close