व्हय, मी शिकलो. पण, प्रगत झालो का ?

आयुष्यात शिक्षण महत्वाचे आहेच.तंत्रज्ञान वापरही गरजेचा झाला आहे. पण, शिकून तंत्रज्ञान वापरूनही आपण चुका करायला लागलेलो आहोत. योग्य निर्णय घेण्याची क्षमता योग्य वेळी आपल्याला साथ देत नाहीये. याचं नेमकं विश्लेषण कसे केलं जायला हवं ? मला आलेल्या अनुभवातून याच काही प्रश्नांची उकलआयुष्यात शिक्षण किती महत्वाचे आहे हे लक्षात आणून देणारा पुढील उतारा, नक्कीच वाचा अन फॉरवर्ड करा.

मध्यंतरात बँकांची एटीएम कार्ड्स स्ट्रीप बाद होऊन चिपधारी झाली. यामुळे एटीएम कार्डची सुरक्षितता वाढवली गेली आहे, असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीचा फायदा मात्र सायबर लुटारूदेखील उठवल्याचे अनुभव यायला लागलेत.

गंगापूररोडवरील विहार हॉटेलजवळ मी बसलो होतो. तेव्हा एका विशीतील डिलिव्हरी बॉयचे फोनवरील संवाद कानावर पडले. तेव्हा पलीकडे कुणाशीतरी बोलताना त्याने एटीएम डिटेल्स विचारून पैसे लुटल्याची घटना समजवून सांगत होता. एटीएम बदली करण्याच्या बहाण्याने फक्त फोन कॉलवरून एटीएम नंबर, पासवर्ड्स आदी गुप्त माहीती विचारून घेतली. पीडित व्यक्ती फोनवर बोलताना चोरी होत असल्याबद्दल त्याला पुसटशी कल्पनाही आली नसल्याचे कळवळून सांगत होती. बँकेत जाऊन चौकशी केली असता आपल्या कार्डवरून होणारे व्यवहारांना रोखण्यासाठीचा अर्ज द्यावे लागल्याची पुष्टीही त्याने जोडली.

एका फूड डिलिव्हरी कंपनीचा बॉय माझ्यापुढे आपली ही हतबल गाथा ऐकवत असताना पाहून खूप हसू फुटले. तोंडात गायछाप ओठांच्यामध्ये नीटपणे ठेवून चघळण्याची कला असलेल्याला स्वतःच्या पैशांबद्दल इतकी पण जागरूकता राहू नये ? अँड्रॉइडवर फेसबुक, व्हॉट्सअपद्वारे मुलींशी, मुलांशी, सगळ्यांशी छान गप्पा मारताना त्याला कुणीच,” बाबा, रे, अशा पद्धतीचे फ्रॉड होत आहेत, तू जरा सावध राहा” असे कुणीच समजवलेलं असू नये ? मग ही चूक नेमकी कुणाची आहे ? शिक्षणव्यवस्थेस हा दोष देता येणार नाही. डिलिव्हरी बॉय होण्याइतपत तर स्वतःच्या बँक खात्यावरील संभाव्य धोके शिकवले नक्कीच गेले असणार. ते त्याला शिकता आले नसेल तर हा दोष व्यवस्थेला देता येणार नाही. उद्विग्न होऊन मला असे उत्तर मिळते की ही करामत सगळी त्या मुलाच्या मेंदूचीच आहे.

हे असे फोन कॉल्स जेव्हा येतात, त्यावेळी पलिकडून कधीही शांतता नसते. प्रचंड गदारोळ ऐकू येत असतो. त्यामुळे मेंदूच्या रॅमचा वापर वाढतो, परिणाम सिस्टीममध्ये गोंधळ उडतो. आपल्या मेंदूच्या मेमरीमधून असे फोन कॉल्स आल्यावर घेण्याची सावधगिरीचे फोल्डर उघडतच नाही. त्यामुळे मेंदूला चुकीच्या कमांड दिल्या जातात.

अशात, कधीकधी काय होतं, पलीकडे जो असतो, तो त्याचा आवाजाचा पिच बदलून बोलत असतो. यामुळे समोरच्या ऐकणाऱ्याला मंजुळ आवाज ऐकू जातो. इकडं आपला सावज झालेला व्यक्ती अलगद त्या मधाळ शब्दांत फसतो. अथवा.

कधी कधी एखादा पुरुष, आपल्याला फोन करून आपलाच बाप बनू पाहतो. इतका घाबरवून सोडतो की आपला मेंदू जो आधीच गोंधळून गेलेला असतो. माहीती देतो बाबा, पण घाबरवू नको. आपण रोजच्या आयुष्यात इतक्या गोष्टींच्या दडपणाखाली सापडलेले असतो की अजून एक भीती आपल्याला नकोच असते. दमून घरी आलेल्या बायकोने जर तिच्या मित्राचे कौतुक केले तर हीच भीती त्या नवऱ्याच्या मेंदूतून डोकं वर काढते. असो, पण तो आजचा विषय नाही.

तर, भीतीपोटी असेल किंवा, वर सांगितल्याप्रमाणे मधाळ बोलण्याला भाग पडणे असेल दहा पैकी एक तरी अशा या जाळ्यात अलगद सापडतो. जो खरंच, काहीच शिकलेला/ली नसेल त्याला फसवलं गेलं तर वाईट वाटणे हळहळप्रधान असते पण चांगली नोकरी करणारा, ई-पेमेंट घेणारा/देणारा, फेसबुक, युट्युब वापरणारा मनुष्य जेव्हा असा फसतो तेव्हा वाटणारे शल्य हे फार्सीकलच असणार. इतकं खुळ आपल्याला या कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाईलचे असते की आपल्याला साध्या गोष्टीचाही विसर पडायला सुरूवात झालेली आहे. नाही, म्हटलं तर जी एखादी गोष्ट आपल्या जीवनमानाचा भाग बनली तर ती सोडून जगणं थोडं मुश्कील आहे. यावर मोबाईल, इंटरनेट वापर कमी करणे हाच एकमेव उपाय आहे. अन्यथा वरच्या प्रसंगाप्रमाणेच परिणामांना आपल्याला सामोरे जायला लागू शकते. त्याचे पैशांचे नुकसान झाले आपलं कदाचित वेगळं काहीतरी नुकसान घडू शकते. तेव्हा आता जमेल तितकं ह्या टेक्नॉलॉजीला ‘रामराम’ म्हणायला शिकले पाहिजे. अन्यथा, हे तंत्रज्ञान आपल्याला ‘मरामरा’ करूनच सोडणार.

© विशाल लोणारी २०१९

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

search previous next tag category expand menu location phone mail time cart zoom edit close