विशाल लोणारी(विशल्या)

माझ्याबद्दल मी काय लिहू ? इथं मी मला अभिव्यक्त करतो, बस्स ! ते आयुष्यात येणाऱ्या खऱ्या अनुभवांशी मिळते जुळते असते किंवा नसतेही. कदाचित योगायोगाने माझे विचार तुमच्या विचारांशी सहमत होतील. असे झाले तरी आनंदच आहे. ऊन, पाऊस, वारा काहीही असो कुठल्या ना कुठल्या लेखनस्वरूपात माझी लेखणी झरत राहील हे नक्कीच.  

मला कुठलीच जात-धर्म पाळायला आवडत नाही. सगळ्याच सणांना माझ्या शुभेच्छा असतात. वाढदिवस खूप खास वाटतो. हे विश्वची माझे घर म्हणून माझं कुणावरही चटकन प्रेम बसतं. मैत्री होते. विश्वासपूर्ण नातं तयार होतं. वयाच्या विविध टप्प्यांवर जवळची माणसे जुळत आली आहेत. 

लहान मुले आवडतात. त्यांच्या मनस्थितीचा अभ्यास अन जपणूक व्हावी असे नेहमी वाटते. काळानुरूप आवश्यक शिक्षण त्यांना सदैव मिळत राहो. 

नाशिक शहरात माझं घर आहे. मिसळीवर माझं निस्सीम प्रेम आहे. सध्या नोकरी नसली तरी लिखाण करत असतो. फ्रिलांसर म्हणून…तेच माझं काम

%d bloggers like this:
search previous next tag category expand menu location phone mail time cart zoom edit close